‘गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची’, उद्धव ठाकरे यांनी केली सत्ताधाऱ्यांवर नाव न घेता टीका

| Updated on: Jul 26, 2023 | 4:25 PM

VIDEO | देशाच्या राष्ट्रपती महिला, तरी देशातील महिलांवर अत्याचार होतात अन् अपत्ती येते? उद्धव ठाकरे यांचा थेट सवाल

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची दैनिक ‘सामना’साठी एक मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या मुलाखतीत सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल आणि राजकारण्यांबद्दल उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले. ही मुलाखत सुरू असताना संजय राऊत यांनी सध्याच्या राजकारणाची संवेदना मेली असे आपल्याला वाटते का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘पूर्वी असे म्हटलं जायचं की, राजकारणाची कातडी ही गेंड्यांची कातडी आहे. आता कदाचित गेंडे असं म्हणत असतील असे तुझी कातडी राजकारण्यांची झालीये. असे उदाहरण देत उद्धव ठाकरे यांनी गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीये’ असे म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं.

Published on: Jul 26, 2023 03:57 PM
शिवसेनेच्या ‘त्या’ 40 आमदारांना मुदतवाढ, अपात्रतेचा मुद्दा पुन्हा लांबणीवर!
अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढणार? अंबादास दानवे यांची नेमकी मागणी काय?