राज्यात अवकाळी अन् सत्ताधाऱ्यांचे प्रचारदौरे; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरे यांचा घणाघात काय?
गेल्या दोन तीन दिवसात राज्यात अवकाळीसह गारपीटनं तडाखा दिलाय. यामुळे रब्बी पिकांसह फळबांगांचंही नुकसान झालंय. अशापरिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल काय?
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : दुष्काळात १३ महिना ही म्हण उपरोधात्मकपणे बोलली जात असली तरी राज्यातील शेतकऱ्यांवर सध्या तीच वेळ आल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कारण गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय तर दुसरीकडे राजकारणादेखील ऊत आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आधीच दुष्काळ त्यात आता रब्बी पिकांचं झालेलं नुकसान यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालाय. गेल्या दोन तीन दिवसात राज्यात अवकाळीसह गारपीटनं तडाखा दिलाय. यामुळे रब्बी पिकांसह फळबांगांचंही नुकसान झालंय. अशापरिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ५ राज्यातील निवडणुकांसाठी प्रचार सभा घेतल्या. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.