बांगलादेश परिस्थितीवरून ठाकरेंच्या निशाण्यावर मोदी, ‘मला औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणता, हिंमत असेल तर…’

| Updated on: Aug 07, 2024 | 1:59 PM

Uddhav Thackeray in new delhi : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे तीन दिवसांकरता नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेणार असल्याचे नियोजन आहे. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बांगलादेशमध्ये असणाऱ्या परिस्थितीवरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

जे मला औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणायचे, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाऊन बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून दाखवावे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, बांगलादेशात जी परिस्थिती सुरू आहे. त्यावर त्यांच्याकडून अजून काही प्रतिक्रिया आली नाही. कालच्या सर्वपक्षीय बैठकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर नव्हते. जर ते युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात, तर मग बांगलादेशमधले हिंदूंवरचे अत्याचारही थांबवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असतील तर सरकारने पावलं उचलली पाहिजेत. तेथील हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. शेख हसीना यांना भारतात आश्रय देताय, मग केंद्राने बांगलादेशमधील हिंदूंचं संरक्षण करावं, ती सरकारची जबाबदारी आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. दरम्यान, संसदेत चर्चेनं आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. जनता सर्वोच्च, सत्तेत असलेल्यांनी याची जाणीव ठेवावी”, असे म्हणत बांगलादेशातील परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला आहे.

Published on: Aug 07, 2024 01:59 PM
मिटकरींवर ‘मनसे’चा पुन्हा हल्लाबोल, घासलेट चोर म्हणत काढली लायकी अन् नवं प्रकरण केलं उघडं
मनसे नेता योगेश चिले यांच्या ‘त्या’ आरोपांवर मिटकरींचा पलटवार; म्हणाले, खंडणीबहाद्दर, टुकार…