Amit Shah : आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून अमित शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात; विरोधक आक्रमक
अमित शाहांनी केलेल्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाहांवर कारवाई करावी, अन्यथा नरेंद्र मोदी यांनी सत्ता सोडावी, असं म्हणत भाजपवरच हल्लाबोल केलाय. काँग्रेसवाल्यांनी शेण खाल्लं, तुम्हालाही शेण खाणं मंजूर आहे का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वक्तव्यावरून आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरांचं नाव घेणं ही आता फॅशन झाल्याचे वक्तव्य अमित शाहांनी सभागृहात केलं आणि काँग्रेसवर टीका केली. यावरूनच आता विरोधक आक्रमक झाले आहेत. तर आपलं वक्तव्य तोडून-मोडून दाखवल्याचं अमित शाहांनी म्हटलं. तर आंबेडकरांचं मी असा अपमान करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्यसभेत संविधानावर चर्चा होती. त्यावेळी काँग्रेसवर तुटून पडताना अमित शाहांनी आंबेडकरांचा उल्लेख केला. सध्या आंबेडकर.. आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. ऐवढंच देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळालं असतं, असं अमित शाह यांनी म्हटलं. अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतरी कारवाई करावी अन्यथा सत्ता सोडावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी करत भाजपवरच टीका केली आहे. भाजपला केंद्रात पाठिंबा देणारे नितीशकुमार चंद्रबाबू नायडू यांच्यापासून रामदास आठवले, एकनाथ शिंदे अन् अजित पवार यांना देखील उद्धव ठाकरेंनी घेरलंय.