उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य अन् रश्मी ठाकरे केदारनाथला… काय दिल्या ठाकरेंसमोर घोषणा?
कालपासून उद्धव ठाकरे यांचं उत्तराखंड दौऱ्यावर असताना जोरदार स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्यासह पूर्ण कुटुंब उत्तराखंडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथचं दर्शन घेतले. आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकरही उपस्थित
उत्तराखंड, 04 नोव्हेंबर 2023 | ठाकरे कुटुंबीय काल उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथचं दर्शन घेतलं. कालपासून उद्धव ठाकरे यांचं उत्तराखंड दौऱ्यावर असताना जोरदार स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथचं दर्शन घेतलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर देखील उपस्थित होते. बद्रीनाथच्या दर्शनाला उद्धव ठाकरे गेले असताना तेथे शिवसैनिक देखील हजर होते. तर यावेळी बेळगावमधल्या सीमा भागातील काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे म्हणत त्यांनी समर्थनही दिले. तर यावेळी उपस्थितांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोटोशूट देखील केले.