शिवसेना फुटीनंतर रविवारी जळगावात उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा; ‘घुसून दाखवा’ म्हणत कुणी दिला इशारा?

| Updated on: Apr 21, 2023 | 7:40 AM

VIDEO | ‘घुसून दाखवा’, जळगावच्या सभेआधीच संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात वॉर, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : शिवसेना फुटीनंतर येत्या रविवारी जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा होणाराय. पाचोऱ्यात ही सभा होणार आहे. मात्र त्या सभेआधीच गुलाबराव आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध रंगलयं. सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गटात आव्हान-प्रतिआव्हान दिलं जातंय. रविवारी होणाऱ्या या सभेचा टिझरही ठाकरे गटानं जारी केलाय. पण सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गटात आव्हान-प्रतिआव्हान दिलं जातंय. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचं ज्या प्रमुख भागांवर लक्ष राहिलंय. त्यापैकी जळगाव जिल्हा एक आहे. सुषमा अंधारेंनी प्रबोधन यात्रेची सुरुवात जळगावातूनच केली होती आणि उद्धव ठाकरे खेड, मालेगावनंतर ठाकरे गट म्हणून स्वतंत्रपणे तिसरी सभा जळगावातच घेतायत. त्यामागचं नेमकं कारण काय आहे? असा सवालही उपस्थित केला जात आहे. बघा स्पेशल रिपोर्ट, काय आहे कारण?

मराठा समाजाला आरक्षण याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही काम करत आहोत
खारघरवरुन वाद कायम, महाराष्ट्र भूषण सन्मानावेळी ‘हाजारो श्री सेवक पाण्याशिवाय तडफडून मेले’, कुणाचा दावा, बघा स्पेशल रिपोर्ट