Loksabha Election 2024 : उन्मेष पाटील यांचे कट्टर समर्थकाला जळगावातून तिकीट, कोण आहे करण पवार?
जळगावातून उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते आणि ठाकरेंकडून त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून उन्मेष पाटील यांना उमेदवारी न देता करण पवार यांना उमेदवारी जाहीर
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. जळगावातून उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते आणि ठाकरेंकडून त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून उन्मेष पाटील यांना उमेदवारी न देता पाटील यांचे समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. जाणून घेऊया कोण आहे करण पवार? पारोळा नगरपालिकेत भाजपकडून नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं. यापूर्वी एरंडोल विधानसभेसाठीही त्यांनी तयारी केली होती. पारोळा एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत. सर्व पक्षांमध्ये संबंध आणि मराठा समाजाचा तरूण चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. तर राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीष पाटील यांचे ते पुतणे आहेत.
Published on: Apr 03, 2024 05:57 PM