‘पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या…’, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांची चेष्टा करत असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले असून सरकारवर अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट केले आहे. शाळेतील विद्यार्थ्याचा फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री दीपक केसकर… विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे’, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुढे त्यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले की, १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.