‘…तसा अंगावर शाल घेऊन एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय’, परबांची राणेंवर नाव न घेता टीका; ठाकरेंही गालातल्या गालात हसले

| Updated on: Mar 25, 2025 | 6:24 PM

'हल्ली काय झालं आहे की मांसाहार खायचं नाही असं कोणीतरी म्हणतं. त्यांना हा अधिकार कुणी दिला? मटण कोणतं खायचं, झटका मटण खायचं की हलाल खायचं हे तुम्ही सांगणार का?'

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत आज मंत्री नितेश राणे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, त्याला वाटतंय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असं म्हणत परबांनी राणेंना खोचक टोला लगावला. पुढे ते असेही म्हणाले, जाती-जातीत आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या राज्यात केला जात आहे. विधान परिषदेत हे बोलत असताना अनिल परब यांच्या बाजूला उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते गालातल्या गालात हसत होते.

”माझ्या सोसायटीत नेपाळी वॉचमन आहे तो रात्रभर ओरडत असतो… जागते राहो… त्याला वाटत त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे. पण तसं नाही. सध्या असंच एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं सांगत आहे. पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही समर्थ आहोत.”, असे म्हणत अनिल परब यांनी नाव न घेत मंत्री नितेश राणे यांच्यावर जहीर टीका केली. पुढे परब असेही म्हणाले, हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, पण ते करत असताना दुसऱ्याच्या धर्मावर आम्ही जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, तशी आम्हची शिकवण आहे.

Published on: Mar 25, 2025 05:47 PM
Shivsena UBT : मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व; ठाकरेंची शिवसेना आक्रमक
Gulabrao Patil : तुमचं आमचं सेम-सेम; अजितदादांच्या ‘त्या’ व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी