Sanjay Raut : ‘… यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये’, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

| Updated on: Nov 28, 2024 | 1:57 PM

दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेची कोणतीही आडकाठी नाही किंवा माझी कोणतीही अडचण नाही. हे स्पष्ट केलं. दरम्यान, यावरून राऊतांनी निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना दिलेत, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तर एकनाथ शिंदे यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. ‘शिवसेना स्वतःला समजणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षाचे निर्णय हे दिल्लीतील मोदी शहा या नेत्यांना दिले असतील. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकर नाहीत, त्यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नयेत’, अशी स्पष्ट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्रिपदावर मोदी-शाह जो निर्णय घेतील तो शिवसेना या पक्षाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. तर सरकार बनवताना माझा अडसर मनात ठेवू नका, असं मोदी-शाह यांना सांगितलं असल्याचे माहितीही एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.

Published on: Nov 28, 2024 01:57 PM
Mumbai Weather : मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI?
Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, ‘मला पाडण्याची त्यांची…’