राज्यातील अन् दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? ठाकरे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी अन् काय इशारा?
VIDEO | 'नितेश राणे ज्यांच्या जीवावर तू भुकतोय, त्यांची राज्यातील आणि दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार', ठाकरे गटाच्या नेत्याने केली भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर खालच्या शब्दात सडकून टीका
सोलापूर, २४ सप्टेंबर २०२३ | ‘नितेश राणे ज्यांच्या जीवावर तू भुकतोय, त्यांची राज्यातील आणि दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार आहे’, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यावर खालच्या शब्दात जहरी टीका केली आहे. पुढे शरद कोळी असेही म्हणाले की, ‘तुला आणि तुझ्या बापाला दिल्लीत जागा मिळणार नाही. संजय राऊतजी उद्धव साहेबाना भेटायला कधीही जाऊ शकतात. पण तुला तुझ्या भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी 17 जणांना भेटावं लागतं. नितेश राणे तुला तुझ्या नेत्यांना भेटण्यासाठी नेत्यांचे तळवे चाटावे लागतात’. तर आज सकाळी संजय राऊत यांनी रोखठोकमधून पंतप्रधान पद टिकावं म्हणून ज्योतिषाच्या सल्लानुसार हे नवीन संसद भवन उभारल्याचा मोठा गौप्यस्फोटही केला होता.
Published on: Sep 24, 2023 06:32 PM