सुषमा अंधारे यांची जीभ घसरली; राणे, सदावर्ते, कंबोज अन् राणा हे नेते नाहीत, तर…., फडणवीस यांनाही कलं टार्गेट
tv9 Marathi Special Report | सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस चाणक्य नाहीत, ते आता मुख्यमंत्री होणार नाहीत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी थेट दावा केला आहे.
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. फडणवीस चाणक्य नाहीत, ते फडणवीस आता मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा अंधारेंनी केलाय. त्याला सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ड्रग्स प्रकरणावरुन सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच हल्ला चढवलाय. सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नागपुरातून सुरुवात झाली. फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत अंधारे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं. फडणवीस चाणक्य नाहीत, ते 2024 ला मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावाच अंधारे यांनी केलाय. तसंच फडणवीसांच्या काही वक्तव्याचा दाखला देत ‘क्या हुआ तेरा वादा’, असा सवालही त्यांनी विचारलाय. तर फडणवीसांच्या अवतीभवती असलेली राणे, सदावर्ते, कंबोज, नवनीत राणा ही नेते मंडळी नाहीत, हे सर्व भूंकणारे आहेत, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावलाय.