‘ते’ देवेंद्र फडणवीस यांच्या तावडीतून सुटले अन्…, सुषमा अंधारे यांनी काय लगावला टोला

| Updated on: Mar 07, 2023 | 7:09 PM

VIDEO | सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला खोचक टोला, बघा काय केली टीका

अहमदनगर : भाजप नेते विनोद तावडे हे हुशार निघाले त्यांनी वेळीच ओळखलं म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या तावडीतून सुटले आणि केंद्रात आपले स्थान निर्माण करू पाहताय. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तावडीत सापडले. चंद्रशेखर बावनकुळे यांची मजबुरी आहे, त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना बोलताही येत नाही आणि सांगताही येत नाही, असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ‘आज होळीचा धुळवळीचा दिवस आहे. आजच्या दिवशी शत्रूलादेखील मित्र म्हणून समजलं जातं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या असल्या तरी आम्ही त्यांच्या टिपणीकडे सकारात्मक पद्धतीने बघतो.’ सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही शुभेच्छा देताना त्यांनी टोला वजा शुभेच्छा दिल्या आहे.

Published on: Mar 07, 2023 06:57 PM
शेतमालाला भाव मिळत नाही! मग आता गावचं इकायचं
नायजेरिय नागरिकांना कोकेनची तस्करी प्रकरणी अटक, 176 कॅप्सुल मधून 29 कोटींचे कोकेन