गृहमंत्र्यांनाच आपल्या पत्नीचं संरक्षण करता येत नाही; सुषमा अंधारे यांचा फडणवीस यांना टोला
फडणवीस यांना स्वतःच्या पत्नीचे संरक्षण करता येत नसल्याचा गंभीर आरोपही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या राज्यात गृहमंत्र्यांची पत्नी सुरक्षित राहत नाही, तर सर्वसामान्यांच्या घरातील महिला कशा सुरक्षित राहतील? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर, १५ फेब्रुवारी २०२४ : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या पत्नीचे संरक्षण करता येत नसल्याचा गंभीर आरोपही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या राज्यात गृहमंत्र्यांची पत्नी सुरक्षित राहत नाही, तर सर्वसामान्यांच्या घरातील महिला कशा सुरक्षित राहतील? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. पुढे सुषमा अंधारे असेही म्हणाल्या की, पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर नुसता ओरखडा निघाला. त्यावेळेला गंभीर कलम लावली गेली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावरती फक्त शाई फेकली तरी सुद्धा संबंधित व्यक्तीवर 307 कलम लावण्यात आलं. पण पत्रकार निखिल वागळे यांच्यावर एवढा प्राणघातक हल्ला होऊनही गुन्हा दाखल केला नाही. याचा अर्थ सत्याधाऱ्यांची जर माणसं असतील तर त्यांना खुलेआम सूट दिली जाते. नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याची गुंजाइश येत नाही. कारण नैतिकतेचा आणि देवेंद्रजींचा फार काही संबंध उरलाय असं वाटत नाही, असा हल्लाबोल देखील अंधारे यांनी केला.