‘…ते मी भविष्यात उघड करेल’, मुख्यमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्यावर संजय राऊत यांचा इशारा
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या काश्मीर दौऱ्यावर संजय राऊत यांचा मोठा खुलासा
मुंबई : ‘शिंदे गटाने सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला आहे. जाहिरातीत चित्र स्पष्ट असलं तरी सर्व काही अलबेल नाही’, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सरकार कोसळणार असा दावाही केला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसारच निर्णय द्यावा लागेल. हे सरकार अपात्र ठरेल आणि हे सरकार दोन महिन्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल. पुढे बोलताना संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला.’मिंधे गटाचे मंत्री हे वरवरचा आव आणत आहेत. चेहऱ्यावर हास्य आणत आहेत. हे उसनं आवसान आहे. भविष्यात काय होईल त्यांना माहीत आहे. मुख्यमंत्री गुलमर्गमध्ये होते. हॉटेल खैबरमध्ये. त्यांना कोण भेटलं कोणते अधिकारी होते काय चर्चा झाल्या. भविष्यात मी उघड करेल’, असा इशारा राऊत यांनी दिला.
Published on: Jun 14, 2023 03:01 PM