Sanjay Raut यांना हायकोर्टाचा दिलासा, कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात काय अपडेट?

| Updated on: Sep 11, 2023 | 3:57 PM

VIDEO | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा, कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधातील ईडीच्या आव्हान याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात ईडीच्या आव्हान याचिकेवर सुनावणी देण्यास न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. त्यामुळे ईडीला आता नवीन खंडपीठासमोर अर्ज करावा लागणार आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाकडे संजय राऊत यांचा जामीन रद्द करा, अशी याचिका दाखल करत मोठी मागणी केली होती. या आव्हान याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. त्यताविरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.

Published on: Sep 11, 2023 03:56 PM
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय?
MSRTC | एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाची मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक, काय झाली चर्चा?