‘फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का?’, संजय राऊत यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 11, 2023 | 7:48 PM

VIDEO | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून समिश्र प्रतिक्रिया उमटत असताना संजय राऊत यांनी नेमका काय सवाल उपस्थित केला?

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप केला. स्मृती ईराणी यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अशातच फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘मित्रत्वाचा हात पुढे करणं या देशात बंधने नाही आहेत. फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का? ज्यांना प्रेमाची घृणा आहे आणि ज्याचे राजकारण द्वेषाच्या भाषणाने आहे. त्यांना फ्लाईंग कीस वेदनादायी वाटू शकते. राहुल गांधींनी संपूर्ण सदनाला म्हणजेच देशाला फ्लाईंग कीस दिला. मोहब्बत की दुकान राहूल गांधी यांनी उघडलेलं आहे. फ्लाईंग कीस हे गुलाबाचे फुल आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 11, 2023 07:38 PM
‘शासन आपल्या दारी, हिसांचार महाराष्ट्रभर करी!’, राज्यातील गुन्हेगारीवरून ठाकरे गटाच्या नेत्याचं बोट
‘इंग्रजांनी बनवलेले ‘ते’ तिन्ही कायदे बदलणार’, मोदी सरकारचा मोठा निर्णय; दुरुस्ती विधेयकात आणखी काय?