संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, ‘रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर आम्ही…’
'त्यांना कोणी म्हटलंय रेडे आहेत. आम्ही डुक्करं नाही मारत. रेडे तर आम्ही गुवाहाटीलाच मारलेत.', असं म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांनी दिलेल्या आव्हानावरून पलटवार केला आहे.
आम्ही डुक्करं मारत नाहीत, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तर रेडे तर आम्ही गुवाहाटीलाच मारले, अशा शब्दात संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रेडा तयार आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या माणसाला घेऊन पाठवावं, असं आव्हान गुलाबराब पाटील यांनी दिलं होतं. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत जहरी टीका केली आहे. ‘निवडणूक लढवतोय हे पक्क. पण ज्यावेळी संजय राऊत आले होते आणि त्यांनी सांगितले ४० रेडे हे गुवाहाटीला जाऊन आलेत त्यांचा आम्ही वध करू…हा रेडा तयार आहे.’, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान दिलं होतं. ‘तुझा माणूस कोण आहे. त्याला तलवार घऊन पाठव गुलाबराव पाटील तयार आहे. मान द्यायला’, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. या आव्हानावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना जहरी शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. बघा काय म्हणाले संजय राऊत?