मनसेनं ‘खुर्ची’ टाकली, संजय राऊत ‘खाट’ टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळीमधील सभेला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यावर संजय राऊत यांनी पलटवार केलाय. राज ठाकरे यांच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची, आपल्या सभेत खाट ठेवू, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेच्या सभेत खुर्ची ठेवल्यावरून त्यांनी निशाणा साधला आहे.
एका खुर्चीवरून सध्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि ठाकरे गटात खडाजंगी पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आपल्या भाषणातून प्रामुख्याने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना दिसताय. त्याचाच एक भाग म्हणून मनसेच्या विक्रोळीतील सभेत संजय राऊत यांच्यासाठी त्यांच्या नावाने एक खुर्ची ठेवण्यात आली होती. भाषा आणि भाषेचा दर्जा कसा असावा हे संजय राऊत यांनी ऐकावं ही त्यामागची मनसेची भूमिका होती. यावर यापुढच्या सभेसाठी आपण खाट टाकू असं म्हणत संजय राऊत यांनी पलटवार केला. दरम्यान, राज ठाकरे भाजप पक्ष वगळता सर्वच पक्षांवर टीका करताय. ठाकरे गटाने मनसेला टार्गेट केलंय. मनसेचे सर्व उमेदवार थेट मागे घेऊन महायुतीचा प्रचार करावा, असं आव्हान ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलंय. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जागांवर मनसेने आपले उमेदवार दिलेत. यापैकी बरेच उमेदवार भाजपच्या विरोधात असले तरी निकालानंतर मनसेच्या पाठिंब्यानंतर भाजपचं सरकार बनवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा दावा राज ठाकरेंचा आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट