Maratha Reservation Protest | जालन्यातील लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशानेच? संजय राऊत यांचा गंभीर आरोप काय?

| Updated on: Sep 01, 2023 | 9:13 PM

VIDEO | उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जालन्यातील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीचार्जच्या घटनेसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय केला गंभीर आरोप?

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून मोठा लाठीचार्ज करण्यात आला आहे. पोलिसांकडून असा आरोप होतोय की, आंदोलकांकडून दगडफेक झाली. या प्रकरणामुळे राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जालन्यातील लाठीचार्जसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘एवढा मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊच शकत नाही. जे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यापासून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था समस्या निर्माण झाल्या आहे. ठाकरे गट या घटनेचा निषेध करते. जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज्यातील अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राज्यात आंदोलन करत असतील तर पोलिसांकडून हल्ले करण्याचं धोरण दिसतंय’

Published on: Sep 01, 2023 09:05 PM
Maratha Reservation Protest | जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, काय घडला प्रकार?
Amchya Pappani Ganpati Anala फेम चिमुकला साईराज केंद्रे tv9 मराठीवर, बघा काय मारल्या गप्पा?