राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; राऊतांचा थेट निशाणा, अजितदादांनी पाप…
अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. 'चोऱ्या लबाड्या कोण करतंय, कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतेय, हे देखील सिद्धिविनायकाला कळतं', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सिध्दिविनायक बाप्पाच्या दर्शनाने विधानसभा प्रचाराचा श्री गणेशा केला आहे. अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जे सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत. ती चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करतंय आणि पाप कोण करतंय या सर्व गोष्टी समजतात. चोऱ्या लबाड्या कोण करतंय, कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतेय, हे देखील सिद्धिविनायकाला कळतं’, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. पुढे संजय राऊत असेही म्हणाले, ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलं आहे. सिद्धिविनायक अशाप्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही, असेही म्हणाले.
Published on: Jul 09, 2024 04:08 PM