मोदींचं नाक कापलंय आता त्यांनी राजीनामा द्यावा, राऊतांनी भाजपला डिवचलं

| Updated on: Jun 04, 2024 | 4:45 PM

मोदींनी सर्वात पहिले राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊतांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला देव समजायचे. आता त्यांचं नाक कापलंय. संजय राऊत यांची भाजपसह मोदींवर टीका... मुंबईत संध्याकाळपर्यंतचे निकाल पाहा, आम्ही पाच जागा जिंकणार आहोत, असा दावा करत संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपने 2014 आणि 2019 मध्ये पक्षाने बहुमत मिळवले मात्र 2024 मध्ये भाजपला बहुमत मिळालेलं नाही. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पराभव आहे. जनतेने त्यांना देशात संपवलं आहे. आता सगळ्यांपुढे मोदी सरकार बनवण्यासाठी हात पाय जोडताय पण मोदी हरताय. मोदींचं सरकार येत नाही, असे वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे. मोदींनी सर्वात पहिले राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊतांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला देव समजायचे. आता त्यांचं नाक कापलंय. आता कापलेल्या नाकाने ते देशात फिरतील. त्यांचं संपूर्ण नाक कापलंय. 400 पार, 300 पार, भाजपला 250 जागाही मिळालल्या नाहीत, असे म्हणत राऊतांनी भाजपला डिवचलं आहे. तर मुंबई आणि महाराष्ट्रात आम्ही भाजपला रोखलं आहे. मुंबईत संध्याकाळपर्यंतचे निकाल पाहा, आम्ही पाच जागा जिंकणार आहोत, असा दावा करत संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

Published on: Jun 04, 2024 04:45 PM
Lok sabha Election Result 2024 : काँग्रेस नेत्यांचा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप, नेत्यांचा आरोप काय? शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार
Baramati Loksabha Election Result 2024 : बारामतीकरांचा कौल शरद पवारांच्या कन्येला, सुनेला नापसंती