Sanjay Raut : संजय राऊत यांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट निशाणा, चोर अन् लफंग्यांचं सरकार…

| Updated on: Oct 17, 2023 | 2:22 PM

VIDEO | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं बेकायदेशीर सरकार हे संविधान विरोधी आहे. हे चोर आणि लफंग्यांचं सरकार चालवताय.

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत. असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं बेकायदेशीर सरकार हे संविधान विरोधी आहे. हे चोर आणि लफंग्यांचं सरकार चालवताय. चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती जर संरक्षण देत असेल तर या देशात काय चाललंय? याची कल्पना न केलेली बरी असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. तर राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदावर असताना देशाच्या काळ्या कुट्ट इतिहासात लिहिले जाईल, असे म्हणत सडकून टीकाही केली आहे.

Published on: Oct 17, 2023 02:22 PM
Ramdas Athawale : मीरा बोरवणकरांच्या अजितदादांवरील आरोपांवर रामदास आठवले यांचं मिश्कील भाष्य
Sanjay Gaikwad : संजय राऊत म्हणजे चोराची…, संजय गायकवाड यांची ‘त्या’ टीकेवर जीभ घसरली