औरंगजेबाच्या मुद्द्यावरून संजय राऊत भडकले, ‘हे तुमच्या सरकारचं अपयश नाही का? केला सवाल
VIDEO | औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. राज्यातील काही भागात दंगलसदृश्य परिस्थिती आहे. कोल्हापुरात जमावबंदी लागू आहे. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना उतरल्या आहेत. हा तणाव कोण निर्माण करत आहे. कोल्हापुरात काही तरुणांचा स्टेट्स वादग्रस्त होता. त्यातून तणाव निर्माण झाला आहे. असं चित्र निर्माण झालं. मी संभाजीनगरातून बोलतोय. याच भूमीत आम्ही औरंगजेबाला गाडलं आहे. जे औरंगजेबाचे भक्त असतील, फोटो नाचवत असतील तर त्यांना देशात राहण्याचा हक्क नाही. त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे. पण फक्त हिंदुत्वासाठी तणाव निर्माण केला जात आहे. ज्यांनी स्टेट्स ठेवला असेल त्यांच्यावर कारवाई करा. ती हिंमत दाखवा, असं आव्हानच त्यांनी भाजपला दिलं. शिंदे-फडणवीस हे स्वत:ला शुद्ध हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतात. मग तुमच्या सरकारमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले कसे जातात? स्टेट्स का ठेवले जातात? हे तुमच्या सरकारचं अपयश नाही का? की हे सर्व तुम्हीच घडून आणत आहात का? असा सवालही राऊतांनी केला आहे.