Sanjay Raut यांनी स्पष्टच सांगितलं…छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?

| Updated on: Oct 01, 2023 | 12:15 PM

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लंडनहून परत आणण्याच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवप्रेमींसाठी ही अभिमानास्पद बाब असली तरी यावरून रजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. अशातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय केलं भाष्य?

मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | शिवरायांची वाघनखं लंडनहून परत आणण्याच्या हालचालींना वेग, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार असून ती वाघनखं पुढील तीन वर्षासाठी भारतात असणार आहे. शिवप्रेमींसाठी ही अभिमानास्पद बाब असली तरी यावरून रजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होऊन याविषयाला राजकीय रंग येताना दिसतोय. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरकारकडून छत्रपती शिवरायांची वाघनखं आणण्याचा प्रयत्न होतोय आनंद आहे. पण छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं म्हणजे शिवसेना आहे हे लक्षात ठेवा. गेल्या ५० वर्षांपासून महाराष्ट्रात येणाऱ्या आक्रमणाचा कोथळा या वाघनखांनी काढलाय आणि आता तीच वाघनखं नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय. त्याच वाघनखांवर वाद सुरू आहे आम्हाला त्यावर वाद घालायचा नाही’, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय.

Published on: Oct 01, 2023 12:12 PM
गृहिणींनो… दिवाळीच्या तोंडावर गणित बिघडणार, गॅस सिलिंडर महागला; ‘इतक्या’ रुपयांनी वाढ
पावसामुळे बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा पर्यटन हंगाम सुरु, अर्थचक्राला गती मिळणार?