‘आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे’, विधानसभेसाठी ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार अन् रणधुमाळी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेना ठाकरे गटाने नवं कोरं गाणं भेटीला आलं आहे.
‘आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे’, असे शब्द असणारं शिवसेना ठाकरे गटाचं गाणं आज लाँच करण्यात आलं आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी गायल असून हे गाणं ऑडिओ स्वरूपात आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गोंधळ गीताचं आज अनावरण करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ‘नंदेश उमप यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरचं त्यांचं पहिलं गाणं आहे. त्यांचा पहाडी आवाज तसाच आहे. श्रीरंग गोडबोले आणि नंदेश उमप यांनी या गाण्यात जान ओतली आहे. संगीतकार आज कामामुळे आले नाहीत.’, असे सांगितले तर गाणं ऐकल्यावर काय बोलायचं. गेली दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारे ठोठावत आहोत. न्याय देवतेवर विश्वास आहे. न्याय मिळत नाही. म्हणून जगदंबेलाचा साकडे घातले तू तरी दार उघड. जनतेच्या न्यायालयात जात आहोत. तोतयेगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार सुरू आहे. घटनाबाह्य सरकार आहे. कोणी त्राता नाही. मला खात्री आहेच की मनापासून जगदंबेला हाक मारल्यावर ती धावून येतेच. हे गाणं आपल्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत, सोशल मीडियापर्यंत आम्ही पोहोचवूच. दसऱ्याला आपण भेटणार आहोतच. पण जनतेच्या दरबारात ही लढाई सुरू झाली असल्याचेही त्यांनी म्हटले.