उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटलं; प्रतापराव चिखलीकर म्हणाले, त्यांची पात्रता…

| Updated on: Oct 04, 2024 | 12:40 PM

नेत्याच्या विरोधात फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरून उद्धव ठाकरे गटाच्या लोहा येथील उपशहरप्रमुखाचे अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. नांदेडमध्ये हा प्रकार घडला.

Follow us on

भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे गटाचे लोहा येथील उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून वडवळे यांचे अपहरण केले. एका फार्महाऊसवर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली इतकंच नाहीतर त्यांचे बोट छाटल्याचेही सांगितले जात आहे. वडवळे यांना पोस्टबद्दल माफी मागायला लावली आणि नंतर त्यांना एका रुग्णालयात सोडून आरोपी पसार झाले असा आरोप जखमींच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मतदारसंघात चिखलीकर यांची दादागीरी वाढली असून आरोपीना अटक केली नाही तर लोहा – कंधार बंद करण्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाकडून देण्यात आला. दरम्यान या घडलेल्या घटनेवर बोलताना माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, मारहाणीचे समर्थन मी करत नाही पण पोस्ट टाकताना आपली पात्रता आणि समोरच्या नेत्याची उंची पहिली पाहिजे. मारहाण करणे चुकीचे आहे. ज्यांनी मारहाण केली मी त्यांना समज देतो. मी चार दिवसापासून मुंबईत आहे. आमची नावे घेतली जाताय त्यात तथ्य नाही असं चिखलीकर म्हणाले .