‘…तर हे कटाक्षाने पाळावं लागेल’, बाळासाहेबांचा राज ठाकरेंना आदेश, ठाकरे गटाकडून ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

‘…तर हे कटाक्षाने पाळावं लागेल’, बाळासाहेबांचा राज ठाकरेंना आदेश, ठाकरे गटाकडून ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Mar 28, 2025 | 5:33 PM

मुंबईत मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. दरम्यान, मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ठाकरेंनी बाळासाहेबांचा एक जुना व्हिडीओ शेअर केलाय.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील एक जुना व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या व्हिडीओमधील भाषणात राज माझा फोटो छापू नको, असा उल्लेख बाळासाहेबांनीच केल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बॅनरवर लावल्यानंतर बाळसाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या जुन्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे असं म्हणताय, ‘राजला मला एक नम्रपणे सांगायचंय. तू शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला मग नंतर तू शिवसेना सोडली. त्यानंतर तुला मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष बनवला. सगळ्याच पदाचा राजीनामा दिला तर मग तुला हे सुद्धा कटाक्षाने पाळावे लागेल’. पुढे ते असेही म्हणाले, नातं तुटलं नाही असुद्या पण त्याला एक सांगायचंय तू शिवसेनेतून बाहेर पडला, सगळ्यातून बाहेर पडला तर तू माझा बॅनरवर फोटो छापू नको, असं राज ठाकरेंना उद्देशून बाळासाहेबांनी सूचना दिल्या होत्या.

Published on: Mar 28, 2025 05:33 PM
Ajit Pawar : ३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
Prashant Koratkar : न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली