‘तेव्हा ‘मातोश्री’वर दंगली भडकवण्यासाठी प्लानिंग होत होती’, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
VIDEO | राज्यात ज्या दंगली होत आहेत यामध्ये उद्धव ठाकरे यांचा हात, भाजपच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : मुंबई दंगली घडवण्यासाठी 2004 साली उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली होती. या बैठकीत चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे आदेश त्यांनी दिले होते, असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात विविध दंगलीबाबत प्रतिक्रिया देताना आमचं महायुतीचं सरकार दंगली घडवत आहे, असा आरोप केला आहे. मात्र 13 ऑगस्ट 2004 साली मातोश्रीवर त्यांनी स्वतः दंगल घडवण्यासाठी एक बैठक घेतली होती. या बैठकीला एका खासदारासह तीन जण उपस्थित होते. त्यात स्वतः उद्धव ठाकरे देखील होते. 1992-93 साली जशा दंगली झाल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. त्यासाठी चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतल्या मुस्लिम फेरीवाल्यांवर वस्तऱ्याने हल्ले करावे असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले होते, असा गंभीर दावा नितेश राणे यांनी केला आहे. यासह गेल्या ९ महिन्यांपासून राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असून त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचे म्हणत याची चौकशी गृहखात्याने करावी, अशी मागणीही केली.