‘काहीजण डोळे वटारल्यावर पळाले’, उद्धव ठाकरे यांनी कुणावर केली अप्रत्यक्ष टीका

| Updated on: Aug 21, 2023 | 8:43 PM

VIDEO | तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. मात्र, आव आणणारे काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली सडकून टीका

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | शिशीर धारकर यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्याचं शिवसेनेत स्वागत आहे. तुम्ही लढवय्यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. काहीजण बघीतले आव मोठा आणतात. डोळे वटारले की पळून गेले. पण, तुम्ही पळपुटे नाहीत, याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावर वार करणं आपली ख्याती आहे. तर अन्याय सहन करायचा नाही. तसं पाहायचं तर तुम्हाला सोपा मार्ग होता. वाशिंग मशीनमध्ये जाऊ शकला असता. पण कर नाही त्याला डर कशाला असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. वाशिंग मशीनमध्ये जायच्या आधी लढवय्यांच्या सेनेत आलात. लढवय्ये शिवसैनिक सोबत आहेत. संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपण टिकतं नाही म्हणतात. पण आपल्याला शहाणपणाची सत्ता आपल्याला आणायची आहे. तुम्ही मूर्ख बनवण्याची उद्योग सुरु केला आहे. तो जास्त काळ चालणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Published on: Aug 21, 2023 08:04 PM
‘महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे तर येड्यांचं सरकार’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
‘२०१९ ला मंत्रीपद मिळेल अशी आशा होती पण…’, संग्राम थोपटे यांनी काय व्यक्त केली खंत?