ठरलं… उद्धव ठाकरे हे ‘मविआ’चे प्रचार प्रमुख, मग मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

| Updated on: Aug 15, 2024 | 4:04 PM

विधानसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकीत काढण्यात येणाऱ्या रॅली, प्रचार सभांमध्येसुद्धा काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. काँग्रेस नेत्यांना काँग्रेस हायकमांडकडून ही माहिती दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर ठाकरेंच्याच नेतृत्वात राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार होणार आहे. तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? हे निवडणुकीनंतर ठरणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांना ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असणार आहेत. प्रचार प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात राज्यात विधानसभेचा संपूर्ण प्रचार होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यात आलं होतं. त्यामुळे ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मविआचे प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आलंय मात्र मविआच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर अद्याप कोणताही निर्णय नाही. तर निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Published on: Aug 15, 2024 04:04 PM
बारक्या पोरांनी काय घोडं मारलंय? आमच्यासाठी लाडकं लेकरू योजना..; भोऱ्याचं भाषण तुफान व्हायरल
‘आता मला रस नाही’, बारामती विधानसभेतून अजित पवार यांची माघार, कोणाला मिळणार संधी?