नवी दिल्लीत संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढला अन्…

| Updated on: Feb 28, 2023 | 2:43 PM

VIDEO | नवी दिल्लीतून मोठी बातमी, संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवला; बघा व्हिडीओ

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर सोमवारी मुंबईतील विधिमंडळ पक्ष कार्यालय शिवसेना पक्षाने गमावले होते. त्यानंतर मंगळवारी दिल्लीतील शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालयही त्यांना गमवावे लागले आहे. दिल्लीतील शिवसेनेचे कार्यालय शिवसेनेला दिल्याचे पत्र खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाने लोकसभा सचिवालयाने पाठवले होते. त्यानंतर आता नवी दिल्लीतून पुन्हा मोठी बातमी समोर आली आहे. संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढला असून या जागी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहे.

Published on: Feb 28, 2023 02:43 PM
Video : लासलगावमध्ये कांदा लिलाव पुन्हा सुरू; कांद्याला दर किती? पाहा…
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत झोपीचं सोंग घेतंय; कुणाचं टीकास्त्र