वेळ, तारीख निश्चित! नागपुरात ‘मविआ’ची पहिली सभा; राज्यभरात कधी-कुठे होणार विराट सभा बघा
VIDEO | महाविकास आघाडीची पहिली सभा किती तारखेला होणार? सर्व सभांना उद्धव ठाकरे यांची हजेरी असणार
मुंबई : राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून सुरू झाली असून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे. दरम्यानस राज्यभरातील महाविकास आघाडीची विराट सभा कधी आणि कुठे होणार याची वेळ आणि तारीखही निश्चित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीची नागपुरातून १६ एप्रिल रोजी पहिली सभा होणार आहे. तर या १६ एप्रिलपासूनच महाविकास आघाडीच्या सभा सुरू होणार असून १ मे रोजी मुंबई, १४ मे पुणे, २८ मे रोजी कोल्हापूर आणि ३ जून रोजी नाशिकमध्ये मविआची सभा होणार आहे. या सर्व मविआच्या सभेला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.
Published on: Mar 12, 2023 04:58 PM