तुम्ही अदानींचे बूटं चाटतायत, धारावीच्या पुनर्विकासावरून उद्धव ठाकरे रस्त्यावर; कोणाला केलं टार्गेट?
मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासावरून अदानींविरोधात उद्धव ठाकरे रस्तावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने बीकेसी येथील अदानींच्या कार्यालयावर मोर्चा निघाला. त्यानंतर अदानींसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला
मुंबई, १७ डिसेंबर २०२३ : मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासावरून अदानींविरोधात उद्धव ठाकरे रस्तावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने बीकेसी येथील अदानींच्या कार्यालयावर मोर्चा निघाला. त्यानंतर अदानींसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. धारावीकरांना ३०० फूटांची घरं मिळणार आहेत. मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली टीडीआर घोटाळाद्वारे धारावी अदानींच्या घशात घालत असल्याच्या आरोप ठाकरे यांनी केलाय. टीडीआर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स अर्थात हस्तांतरणीय विकास हक्क. समजा एखाद्या बिल्डरला आखून दिलेल्या क्षेत्रपळाऐवढं बांधकाम करता येत नसेल तर टीडीआर तयार होतो. आोणि तो बिल्डरला कुठेही वापरू शकतो. धारावीच्या या मोर्च्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरले. येत्या साडेचार महिन्यातच लोकसभा निवडणुका आहे. त्यापूर्वीच मोर्च्याच्या माध्यमातून ठाकरेंनी शक्तिप्रदर्शनही केलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट