‘एक फूल आणि दोन हाफ सरकारचं काम शून्य’, अंतरवाली सराटी गावातून उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Sep 03, 2023 | 12:38 AM

VIDEO | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्यासह उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे अंतरवाली सराटी गावात दाखल, आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार निशाणा

जालना, २ सप्टेंबर, २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी गावात आज दाखल होत शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर आता उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हे देखील हजर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यभरातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर तुमच्या भेटीला आलो. केंद्र सरकारने गणपतीच्या दिवसात संसदेचे अधिवेशन ठेवले आहे. मराठा समाजासह धनगर, ओबीसी समाजाला न्याय द्या. एक फूल आणि दोन हाप सरकारचं काम शून्य आहे. काम काही नाही. पण, सरकार आपल्या दारी. सरकारमध्ये असताना आम्ही तुम्हाला भेटत होतो. आता कोणीही नाही, तरी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला भेटायला आलो आहे, असंही ठाकरे म्हणाले.

Published on: Sep 03, 2023 12:38 AM
मराठा समाजाला कसं मिळू शकतं आरक्षण? आरक्षण देण्याचे पर्याय नेमके काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार कोण? मनसे नेत्यानं काय व्यक्त केली इच्छा?