उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने रविवारी कारवाई केली. राऊत यांच्या भांडुप निवासस्थानी ईडीने छापे घालून सुमारे साडेनऊ तास शोधमोहीम राबवली.
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने रविवारी कारवाई केली. राऊत यांच्या भांडुप निवासस्थानी ईडीने छापे घालून सुमारे साडेनऊ तास शोधमोहीम राबवली. साडेअकरा लाखांची रोकड जप्त करून अधिकाऱ्यांनी राऊत यांना ताब्यात घेऊन ईडीच्या कार्यालयात नेलं. तिथे संध्याकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे हे राऊत यांच्या भांडुप इथल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, रविंद्र वायकर, मिलिंद नार्वेकर हेसुद्धा होते. उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
Published on: Aug 01, 2022 02:16 PM