… आता पुरे, जी कारवाई करायची ती करा; राजन साळवी यांचा थेट इशारा

| Updated on: Jan 11, 2024 | 6:32 PM

उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी सुरू आहे. गेल्या दीड वर्षापासून राजन साळवी यांच्या संपत्तीची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आताही राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. यावेळी एसीबीला हवी तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले.

रत्नागिरी, ११ जानेवारी २०२४ : उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी सुरू आहे. राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची एसीबी चौकशी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा राजन साळवी यांना फोन केला आणि फोनवरून उद्धव ठाकरे यांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. गेल्या दीड वर्षापासून राजन साळवी यांच्या संपत्तीची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आताही राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. यावेळी एसीबीला हवी तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजन साळवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले तर आता यापुढे कुठल्याही चौकशीला सामोरं जाणार नाही, माझ्याकडची सर्व माहिती एसीबीला दिली. आता चौकशी पुरे, जी कारवाई करायची ती करा, असं म्हणत आमदार राजन साळवी यांनी थेट इशाराच दिला आहे.

Published on: Jan 11, 2024 06:32 PM
बंडखोर कौन नही है, जरा … आमदार अपात्रतेच्या निकालावर बच्चू कडू यांचं मिश्किल भाष्य
Tv9 Exclusive : इमान राखून निकाल दिला की नाही? राहुल नार्वेकर यांनी TV9 मराठीवर रोखठोक सांगितलं…