मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसताय, संजय राऊत यांचा रोख कुणावर?

| Updated on: Feb 17, 2024 | 3:46 PM

मर्जीतल्या उद्योगपतींना ठेके देऊन त्या बदल्यात निवडणूक निधी म्हणून शेकडो कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड घ्यायचे हा भाजपचा गोरखधंदा आहे. म्हणून त्यांच्या तिजोरीत हजारो कोटी जमा आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : गौतम अदानी आणि भाजप वेगळे नाही. ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड विकत घेऊन भाजपची तिजोरी भरली त्यांची नाव जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये वरचे नाव अदानींचे असणार अशी खात्री संजय राऊत यांनी व्यक्त केली. तर मर्जीतल्या उद्योगपतींना ठेके देऊन त्या बदल्यात निवडणूक निधी म्हणून शेकडो कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड घ्यायचे हा भाजपचा गोरखधंदा आहे. म्हणून त्यांच्या तिजोरीत हजारो कोटी जमा आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. तर मुंबईतील मिठागराची जागा अदानींना, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना आणि आता वांद्रे रेक्लमेशनचा भूखंडही अदांनींना..अख्खी मुंबई अदानींना….मुंबईचे नाव बदलून अदानीनगर केले तर मुंबईसाठी हुतात्मा झालेले १०६ जण पुन्हा स्वर्गात हौताम्य पत्करतील, असे म्हणत शिंदे काय करत आहे, असा सवाल केला. मुंबईवरचा ठसा पुसला जातो आणि हे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसलेत, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय.

Published on: Feb 17, 2024 03:46 PM
‘शिवसेनेत राहून माझी 15 वर्ष वाया’, ठाकरेंच्या शिवसेनेतून ‘वंचित’मध्ये गेलेल्या शिवसैनिकाची खंत
बारामतीकर वर्षानुवर्ष आम्हाला… अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेचा शरद पवार यांच्याकडून समाचार