उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर आज पत्रकार परिषद, जाणून घ्या महत्त्वाच्या बातम्या

| Updated on: Feb 08, 2023 | 9:55 AM

मातोश्रीवर घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष

मुंबई : आदित्य ठाकरे यांची सभा सुरू असताना मुद्दाम दगडफेक घडवण्यात आली, अंबादास दानवे यांच्या आरोपानंतर पोलीस महासंचालकांना त्यांनी पत्र लिहिले आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत पत्रातून अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर हल्ला होणं अयोग्य आहे, आदित्य ठाकरे यांना सुरक्षा देऊन पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची आज साडेबारा वाजता पत्रकार परिषद आहे. ही पत्रकार परिषद मातोश्रीवर घेण्यात येणार असून कुणाचा समाचार घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असून फडणवीसांच्या आदेशानुसार प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. तर शिंदे- फडणवीसांची स्वतंत्र जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे

Published on: Feb 08, 2023 09:55 AM
वरळीतील सभेचा व्हीडिओ शेअर करत संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
आदित्य ठाकरे अजूनही बालिश, राजकारण शिकायचे आहे तर… भाजपच्या या नेत्याचा सल्ला काय?