BMC चं ऑडिट, उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत
BMC ऑडिटसाठी शिंदे सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या संदर्भातील मोठी घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. नियोजन नगरविकास विभागाचे सचिव या 3 सदस्यीय समितीत समाविष्ट असणार आहे. पुढील अधिवेशनात या समितीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेचे ऑडिट करण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या या ऑडिटसाठी शिंदे सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या संदर्भातील मोठी घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. नियोजन नगरविकास विभागाचे सचिव या 3 सदस्यीय समितीत समाविष्ट असणार आहे. पुढील अधिवेशनात या समितीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांबाबत काही शंका उपस्थित केल्या आणि 25 वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ऑडिटवर देखील शंका उपस्थित करण्यात आली आहे. म्हणून नगर विकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून कालच उत्तर देत तीन लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे सांगितले. ही समिती सविस्तर आर्थिक व्यवहाराची चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचा देखील निर्णय कालच्या चर्चेच्या झाला असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.