दसरा मेळाव्याला परवानगी मिळताच उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शिवसैनिकांना म्हणाले…

| Updated on: Sep 23, 2022 | 5:45 PM

कोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ते शिवसैनिकांना संबोधित करताना बोलत होते.

मुंबई: अखेर शिवसेनेला (shivsena) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. कोर्टाने ही परवानगी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुमचा हा उत्साह, प्रेम आणि एकजूट अशीच कायम ठेवा. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे. आपल्याला शिवरायांचा भगवा फडकवायचाच आहे. निवडून आल्यावर रुसवे फुगवे, होऊ देऊ नका. गटतट होऊ देऊ नका, असं सांगतानाच भगवा झेंडा हीच आपली उमेदवारी आहे. त्यासाठी कामाला लागा, असं आवाहन उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं. कोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ते शिवसैनिकांना संबोधित करताना बोलत होते.

Published on: Sep 23, 2022 05:45 PM
Video : खैरेंकडून बावनकुळेंची नक्कल… सूर्यासमोर दिवा… वर काय म्हणाले?
Politics : दसरा मेळाव्यापूर्वीच न्यायालयाने मिटविला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, नेमका कसा?