Uddhav Thackeray : ‘हा ‘नोट जिहाद’ आहे का? पैसा बाटेंगे आणि …’, विनोद तावडे प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झाला असेल तरी आरोपी फरार व्हायला नको. कारण असं काही ठिकाणाहून काल सुद्धा मला माहिती मिळाली. कदाचित त्यांच्यात गँगवार असतील, निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणाने कारवाई केली पाहिजे. कायदा सर्वांसाठी सारखा असेल तर तो दाखवला पाहिजे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंना बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी विनोद तावडेंच्या बॅगेत 5 कोटी रुपये असल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणावर आता उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “काल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं डोकं आपोआप फुटलं. त्यानंतर आज पैसे वाटपाचा व्हिडीओ समोर आला हे जादूचे पैसे आले कुठून? कुणाच्या खिशातून जात होते? याची माहिती समोर आली पाहिजे. आणि ज्यांनी हे उघड केलं असेल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण कदाचित हे त्यांचं आपापसातील गँगवार असू शकेल. भाजपांतर्गत किंवा मिंदे आणि त्यांच्यातर्गतही असू शकेल ”, अशी शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. भाजप-शिंदे आणि अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे आणि जितेंगे असं काही आहे का? त्याचा छडा लागायला पाहिजे. हा भाजपचा नोट जिहाद आहे, पैसा बाटेंग और जितेंगे असं काहीसं आहे. यावर आता कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. बघा काय म्हणाले उद्धव ठाकरे?