VIDEO : CM Sangli Visit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या भिलवडीत दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूराने प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडीला भेट दिली. यावेळी छोटेखानी सभा पार पडली. या सभेला ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना सरपंचांच्या वतीने निवेदनही देण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूराने प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडीला भेट दिली. यावेळी छोटेखानी सभा पार पडली. या सभेला ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना सरपंचांच्या वतीने निवेदनही देण्यात आलं. कोरोनाचं संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा आपण सामना करत आहोत. त्यामुळे अशी गर्दी करू नका. कोरोनाचं संकट आणि कोसळलेलं दु:ख याची मला कल्पना आहे. तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.