त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरे यांचा रोख कुणावर?

| Updated on: May 12, 2024 | 1:12 PM

निवडणूक आयोगालासुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी हललाबोल केलाय. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी हा निशाणा साधला. काय म्हणाले बघा?

Follow us on

धनुष्यबाण ते मशाल यांचं झालेलं स्थित्यंतर आणि त्याचा या निवडणुकीमध्ये नेमका काय परिणाम झाला. यावर उद्धव ठकरेंनी उत्तर देताना रोखठोक मत माडंलं. धनुष्यबाण ते मशाल… हे का घडले? कोणी घडवले? लोकशाहीचे एक प्रकारे धिंडवडेच निघतायत. सविधान पाळलं जात नाहीये. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस अजूनही तिचा निकाल लागत नाहीये. वारंवार कोर्टान फटकारे मारलेत. खडे बोल सुनावलेत, तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते. त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? त्यांनी अधिवेशन बोलावल ते कसं चूक होतं, त्याच्यानंतर लवादाने दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगालासुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी हललाबोल केलाय. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी हा निशाणा साधला. तर पुढे ते असेही म्हणाले, पक्ष कुणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत. म्हणजेच लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कड़ी म्हणजे अजूनही याचा निर्णय आलेला नाहीये. सगळाच गोंधळ सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.