सगळेच रक्तालाही चटावलेले, सरकारला आरोपी करा; पुणे कार अपघातावर ‘सामना’तून हल्लाबोल

| Updated on: May 29, 2024 | 2:05 PM

'गुन्हा केल्याने आरोपी तर गुन्हेगार आहेतच, परंतु त्यांच्या बचावासाठी आटापिटा करणारी सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे पोशिंदेदेखील गुन्हेगारच ठरतात', पुणे कार अपघात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस वेगळ्या वळणावर पोहोचत आहे. अशातच सामना या वृत्तपत्रातून सरकारवर जोरदार हल्लाबोल

Follow us on

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन केसमुळे राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे. पुणे कार अपघात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस वेगळ्या वळणावर पोहोचत आहे. अशातच सामना या वृत्तपत्रातून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सरकारला आरोपी करा, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे तर ‘पुणे ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाने ससून रुग्णालय किंवा आरोग्य विभागच नव्हे, तर राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’ भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. तपासातील सुरुवातीपासूनचे गडबड-घोटाळे, त्यातील राजकीय हस्तक्षेपांची झालेली पोलखोल, आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकण्याचा प्रकार आणि या प्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीची सूत्रे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडेच सोपविणे हे सगळेच भयंकर आहे. गुन्हा केल्याने आरोपी तर गुन्हेगार आहेतच, परंतु त्यांच्या बचावासाठी आटापिटा करणारी सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे पोशिंदेदेखील गुन्हेगारच ठरतात. मिलॉर्ड, या प्रकरणात सरकारलाच आरोपी करा!’, असा घणाघात सामनातून सरकारवर करण्यात आला आहे.