मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटी खर्च, शिंदे गटावर कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Sep 08, 2023 | 9:40 AM

VIDEO | मुंबईतील ठाकरे गट शिवसेनेचे नगरसेवर फोडण्यासाठी ७०० कोटी खर्च झाले, यामध्ये पालिकेचा निधी आहे. नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवरच सुरू, कुणी केला शिंदे गटावर आरोप?

मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ | मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटी खर्च झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी मुंबई पालिकेचा निधी वापरल्याचा आरोप शिवसेना मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून एकनाथ शिंदे गटावर करण्यात आला आहे. तर नगरसेवक फोडण्यासाठी खर्च करेला जाणारा पैसा हा पालिकेचा निधी आहे. इतकेच नाही तर नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवरच सुरू आहे, असा आरोपही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समानातून शिंदे गटावर करण्यात आला आहे. ही उधळपट्टी थांबवून हा सर्व पैसा दुष्काळ निवारण्यसाठी आणि शेतकरी बांधवाचे प्राण वाचविण्यासाठी खर्चायला हवा, असे म्हणत ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे.

Published on: Sep 08, 2023 09:38 AM
मुंबईसह उपनगरात दिवसभरात अनेक गोविंदांना दुखापत, ‘इतके’ गोविंदा झाले जखमी
महाडिक गटाला मोठा धक्का, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1,272 सभासद अपात्र