‘मविआ’च्या वज्रमूठ सभेवर उदय सामंत यांचं टीकास्त्र, बघा काय केला हल्लाबोल

| Updated on: Apr 02, 2023 | 4:07 PM

VODEO | 'मी साडेनऊच्या पत्रकार परिषदेवर एकदाच बोलतो', ठाकरे गटाच्या नेत्यावर केली नाव न घेता सडकून टीका

रत्नागिरी : महाविकास आघाडीची पहिलीच संयुक्त सभा आज संभाजीनगरमध्ये होत आहे. संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार असून या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला करणार असल्याने या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उदय सामंत म्हणाले, पंधरा ते वीस दिवसांपूर्वी नऊ हजार खुर्च्या लावून एक लाखांची सभा झाली या अविर्भावात काही लोकांनी खेडला सभा घेतली. त्यानंतर दहापट मोठी सभा घेऊन आम्ही केवढी मोठी सभा घेऊ शकतो हे दाखवून दिले. तर वज्रमूठ सभा घेत असताना राहुल गांधींचं सावरकरांबद्दलचं म्हणणं काय आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेची भूमिका काय हे या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं पाहिजे, असे म्हणत उदय सामंत यांनी हल्लाबोल चढवला.

Published on: Apr 02, 2023 03:56 PM
हाती मशाल, उद्धव ठाकरेंच्या सभास्थळापर्यंत अनवाणी प्रवास; कोण आहे ‘तो’ निष्ठावंत?
‘मविआ’च्या वज्रमूठसभेची तयारी पूर्ण; अशी आहे व्यवस्था, बघा ड्रोन दृश्य