‘वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले’, ‘सामना’ अग्रलेखातून शरद पवार यांनाच घेरलं

| Updated on: May 08, 2023 | 8:21 AM

VIDEO | दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच केलं लक्ष्य, काय केली टीका ज्यामुळे उडाली एकच खळबळ

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो त्यांनी मागेही घेतला. मात्र शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र शरद पवार यांनी पक्षातील बडे नेते तसेच कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने आपला निर्णय मागे घेतला आणि सुरू असलेल्या राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला. यासंदर्भात दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून पहिल्यांदाच शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या उणीवा दाखवण्यात आल्या आहेत. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचंही अग्रलेखातून म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला, असे म्हणत शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Published on: May 08, 2023 08:21 AM
अहमदनगरमध्ये असे काय सापडलं की पुरातत्वीय विभागाचे 50 प्रशिक्षणार्थी तज्ज्ञ संशोधन करतायत?
Special Report | शरद पवार यांनी भाकरी फिरवली पण पंढरपुरात! कोण लढणार विधानसभा निवडणूक?