‘…तो मोदींचा तरी होईल का?’, शिवसेनेच्या जाहिरातीवरून ठाकरे गटाचा खोचक सवाल

| Updated on: Jun 14, 2023 | 8:24 AM

VIDEO | 'मिंधे गटाची फुकाची जाहिरातबाजी म्हणजे...', शिवसेनेच्या जाहिरातीवरून सामनातून हल्लाबोल

मुंबई : मिंधे गटाची फुकाची जाहिरातबाजी म्हणजे वरवरची रंगसफेदी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेच्या जाहिरातीवर सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. तर चला एक बरे झाले, शिवसेनाप्रमुखांबाबतचे यांचे प्रेम व आदर म्हणजे निव्वळ ढोंग होते हे कालच्या जाहिरातबाजीने स्पष्ट केले, पण जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का? असा सवालही यातून करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण सगळय़ांनी खूप कल्पक जाहिराती पाहिल्या असतील, पण अशी जाहिरात होणे नाही!, असे म्हणत सामनातून शिवसेनेच्या जाहिरातीवर बोचरी टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकार हे अजब असे जाहिरातबाज सरकार आहे. आतापर्यंत या बेकायदा सरकारने असंख्य जाहिराती दिल्या, पण काल मिंधे गटातर्फे प्रसिद्ध झालेल्या एका पूर्ण पान जाहिरातीने फडणवीसांसह त्यांच्या 105 आमदारांच्या काळजाचे पाणी पाणीच झाले आहे. सर्वच वृत्तपत्रांत कोटयवधी रुपये खर्च करून अगदी पहिल्या पानावर ‘मोदी- शिंद्यांच्या फोटोसह जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस गायब आहेत. ही जाहिरात सरकारी नसून चोरलेल्या बनावट शिवसेनेची आहे, असेही म्हटले आहे.

Published on: Jun 14, 2023 08:21 AM
अजित पवार यांनी राऊत यांना पुन्हा डिवचलं; टोमना ही मारला, म्हणाले, ‘जास्तच प्रेम उतू चाललय’
कमजोर लोग…!शिवसेनेची बॅनरबाजी, तर भाजपची टोलेबाजी