‘घबराए नही, हम मराठी सिखाएंगे’, राज ठाकरेंच्या ‘खळखट्याक’ इशाऱ्यानंतर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी अन् मनसेला उत्तर

‘घबराए नही, हम मराठी सिखाएंगे’, राज ठाकरेंच्या ‘खळखट्याक’ इशाऱ्यानंतर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी अन् मनसेला उत्तर

| Updated on: Apr 05, 2025 | 1:34 PM

मुंबईत मनसे मराठी भाषेबाबत आक्रमक भूमिका घेत आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे मनसेला घाबरू नका असे निर्देश देत आहेत आणि आम्ही मराठी भाषा शिकवणार आहे, असे बॅनर लावून लोकांना जागृत केले आहे. आनंद दुबे यांनी अंधेरीसह अनेक भागात बॅनर लावले आहेत.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आग्रही भूमिका घेतली असून मनसैनिक गेल्या चार-पाच दिवसांपासून बँका, सार्वजनिक अस्थापनांना भेट घेऊन मराठी भाषेचा आवर्जून उल्लेख करा, या आशयाचं एक निवदेन देत आहेत. यासह त्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देखील मनसैनिकांनी यावेळी दिला. दरम्यान, मराठी भाषेसाठी आता मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूव जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यांना मराठी बोलायला, वाचायला आणि लिहायला येत नाही, अशा लोकांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून खास शिकवणी असल्याचे या बॅनरवर नमूद केलं आहे. ‘घाबरू नका, चला मराठी बोलूया… चला करूया मराठी भाषेचा सन्मान.. घबराए नही हम सिखाएंगे आपकोमराठी भाषा… आईए मिलकर सिखेंगे मराठी भाषा’, असं या बॅनरवर म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत.

Published on: Apr 05, 2025 01:34 PM
Karuna Sharma : करूणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
‘…म्हणून दादरसारख्या भागात अमित ठाकरे हरले’, उद्धव ठाकरेंच्या हिंदी भाषिक प्रवक्त्यानं सांगितलं दारूण पराभवाचं कारण